गणेश म्हणजे ज्ञान आणि उंदीर म्हणजे छोटासा विचार, मूलसूत्र. विचार हेच ज्ञानाचे वाहन असते. दुसऱ्या अर्थाने प्रचंड असे जे ज्ञान आहे त्याच्या मुळाशी फक्त छोटे सूत्र असते. ते अनेक प्रकारांनी आणि विविध परिस्थितीमध्ये वापरून प्रचंड ज्ञान तयार होते. उदा.: बेरीज आणि वजाबाकी हिच गणिताची पायाभूत सूत्रे आहेत. गुणाकार म्हणजे अनेक वेळा बेरजेचे वेगवान रुप आणि भागाकार म्हणजे अनेक वेळा वजाबाकी चे वेगवान रुप. या मूलभूत तत्त्वाशिवाय गणिताची आणि विज्ञानाची कोणतीही शाखा प्रगत होऊ शकत नाही.
हाच प्रकार विचार इतर सर्व शाखांबाबत लागू होऊ शकतो. एक मात्र खरे की अशी मूलतत्त्वे अगणित आहेत आणि जगाचा व्यवहार अशा मूलतत्त्वांपासून बनलेल्या अगणित शाखांमुळे चालतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा