शनिवार, २९ एप्रिल, २०२३

श्रीमंत आणि गरीबाचा खर्च

आजच्या काळात भरपूर खर्च करणे, हे एक सूत्र बनले आहे. त्यासाठी भरभरून कमविणे हाच उपाय आहे. खर्च केल्याशिवाय सुख लाभत नाही. सुखाशिवाय शांति नाही. शरीर सुखी झाले तरच मन शांत राहू शकते. शरीर सुखी ठेवण्यासाठी खर्च करून सुखोपभोग मिळवावे लागतात.

गरीब माणूस नाईलाजास्तव तात्पुरत्या सुखांच्या मागे असतो. श्रीमंत पैशाच्या जोरावर एकगठ्ठा सुखामागे असतो. शक्ती आणि इच्छेनुसार गरीबाला छोट्या अवधिच्या सुखोपभोगामागे खर्च करावा लागतो, सिनेमा पहातो तर श्रीमंत टीव्ही व्हिडिओ घेतो. गरीबाला बसने जावे लागते तर श्रीमंत वाहन खरेदी करतो.
गंमत म्हणजे खर्चामुळे श्रीमंतांचा वेळ वाचतो व तेवढ्याच अवधीत धंदाव्यवसायासंबंधी जास्त उलाढाली करुन तो पैशाची कमतरता भरून काढतो एवढेच नव्हे तर श्रीमंतीत भरच घालत राहातो.

गुरुवार, २७ एप्रिल, २०२३

ब्रुस ली ने काय शिकविले

ब्रुस ली: 
You must have control on your Immotions.
Look at the moon and not at the pointing finger.
Your eyes must look at the respected person though you bow in front of him.

तुमच्या भावनांवर तुमचे नियंत्रण असले पाहिजे.

बोटाने चंद्र दाखविणाऱ्याच्या बोटाकडे लक्ष न देता चंद्राकडे पहायचे असते.

आदरणीय व्यक्ती पुढे झुकत असला तरी दृष्टी लक्ष त्या व्यक्तीवरच असले पाहिजे.


बुधवार, २६ एप्रिल, २०२३

गणेश प्रतीकांचा अर्थ

महाकाय गणेशाचे वाहन पिटुकला उंदीर असे कां ? 
गणेश म्हणजे ज्ञान आणि उंदीर म्हणजे छोटासा विचार, मूलसूत्र. विचार हेच ज्ञानाचे वाहन असते. दुसऱ्या अर्थाने प्रचंड असे जे ज्ञान आहे त्याच्या मुळाशी फक्त छोटे सूत्र असते. ते अनेक प्रकारांनी आणि विविध परिस्थितीमध्ये वापरून प्रचंड ज्ञान तयार होते.  उदा.: बेरीज आणि वजाबाकी हिच गणिताची पायाभूत सूत्रे आहेत. गुणाकार म्हणजे अनेक वेळा बेरजेचे वेगवान रुप आणि भागाकार म्हणजे अनेक वेळा वजाबाकी चे वेगवान रुप. या मूलभूत तत्त्वाशिवाय गणिताची आणि विज्ञानाची कोणतीही शाखा प्रगत होऊ शकत नाही.
हाच प्रकार विचार इतर सर्व शाखांबाबत लागू होऊ शकतो. एक मात्र खरे की अशी मूलतत्त्वे अगणित आहेत आणि जगाचा व्यवहार अशा मूलतत्त्वांपासून बनलेल्या अगणित शाखांमुळे चालतो.