रविवार, २२ मे, २०११

erradicating corruption

भ्रष्टाचार मिटविण्यासाठी नवीनही काही उपाय योजना करायला हव्यात. वेगवेगळे कायदे बनविण्यापेक्षा कायद्यातील सोपेपणा हा जास्त उपयुक्त ठरेल असे मला वाटते. भ्रष्टाचाराच्या मूळावर घाव घालण्यासाठी सोपेपणा हा ही एक उपाय आणि प्रभावी उपाय ठरू शकतो. जेवढा कायदा क्लिष्ट तेवढ्या पळवाटा जास्त असेही कधीकधी जाणवते. त्यामुळे नवीन कायदे आवश्यक तेथे करावे लागतील पण त्याचबरोबर सोपेपणा, सामान्यांना समजेल असे नीती शास्त्र आधारित सोपेपणा आणणे ही तितकेच महत्वाचे आहे.

corruption

राम देव बाबा यांचे काळ्या पैशाविरूद्धचे अभियान लवकरच सुरु होणार आहे. सर्वांनी त्यांना पाठींबा द्यावा.  राम देव बाबा करतायत तो भ्रष्टाचाराच्या डोक्यावर वार आहे.  अण्णा हझारेजी करतायत तो शरीरावर वार आहे. भष्टाचार आणि काळा पैसा यावर शक्य त्या सर्व प्रकारांनी घाव घातला पाहिजे. भष्टाचार आणि काळा पैसा याचे दुष्परिणाम आणि तोटे सर्वाना माहित आहेत. परदेशात असलेला भारताचा काळा पैसा आपल्या येथे आणल्यास फार समृद्धी आणि प्रगती होऊ शकते.  भ्रष्टाचार आणि काळा पैसा यांची कीड नष्ट करण्यासाठी आणखी असतील ते सर्व उपाय अमलात आणायला हवेत. ज्यांना ज्यांना असे उपाय सुचतात त्यांनी ते मांडायला पाहिजेत. जास्तीतजास्त सोपे सरळ उपाय फार महत्वाचे आहेत. सर्वांनी या अभियानांना पाठींबा द्यायलाच हवा.