राम देव बाबा यांचे काळ्या पैशाविरूद्धचे अभियान लवकरच सुरु होणार आहे. सर्वांनी त्यांना पाठींबा द्यावा. राम देव बाबा करतायत तो भ्रष्टाचाराच्या डोक्यावर वार आहे. अण्णा हझारेजी करतायत तो शरीरावर वार आहे. भष्टाचार आणि काळा पैसा यावर शक्य त्या सर्व प्रकारांनी घाव घातला पाहिजे. भष्टाचार आणि काळा पैसा याचे दुष्परिणाम आणि तोटे सर्वाना माहित आहेत. परदेशात असलेला भारताचा काळा पैसा आपल्या येथे आणल्यास फार समृद्धी आणि प्रगती होऊ शकते. भ्रष्टाचार आणि काळा पैसा यांची कीड नष्ट करण्यासाठी आणखी असतील ते सर्व उपाय अमलात आणायला हवेत. ज्यांना ज्यांना असे उपाय सुचतात त्यांनी ते मांडायला पाहिजेत. जास्तीतजास्त सोपे सरळ उपाय फार महत्वाचे आहेत. सर्वांनी या अभियानांना पाठींबा द्यायलाच हवा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा